सॅनिटरी पॅडस् : करमुक्त की जीएसटीयुक्त?
प्रत्येक स्त्री आणि मुलगी पाळीतील स्वच्छता घेण्यास सक्षम होईल, मासिक पाळी व्यवस्थापन योग्य प्रकारे, आत्मविश्वासाने आणि सन्मानपूर्वक करू शकेल, यासाठीची मोहीम चालू आहे. त्याला अधिक सार्वजनिक व उत्सवी रूप देणे हे २८ मे या विशेष दिवसाचे प्रयोजन आहे. या निमित्ताने केवळ पाळी दरम्यानची स्वच्छता नव्हे तर त्यानंतरची पर्यावरणीय स्वच्छता आणि पाळीविषयीच्या स्वच्छ दृष्टीकोनाची आवश्यकता यांचाही जरूर विचार व्हायला हवा.......